5kW सोलर पॅनल किती वीज निर्माण करतो? जाणून घ्या सविस्तर माहिती! 

आजच्या काळात सोलर एनर्जी ही स्वच्छ, हरित आणि खर्च वाचवणारी पर्याय बनली आहे.

अनेक घरं आणि व्यवसाय आता सोलर पॅनल बसवून आपल्या वीज खर्चावर नियंत्रण मिळवत आहेत. यातच सर्वात लोकप्रिय सोलर सिस्टिम म्हणजे 5kw Solar Panel

पण प्रश्न असा निर्माण होतो की, 5kw Solar Panel नक्की किती वीज निर्माण करतो? चला तर मग, याचं सोप्या भाषेत उत्तर जाणून घेऊया.

5 किलोवॅट म्हणजे एकाच वेळी 5000 वॅट्स ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता.

या सोलर सिस्टिममध्ये साधारणतः 15 ते 17 सोलर पॅनल्स असतात (प्रत्येक पॅनल साधारणतः 330W ते 350W चा). हा सोलर सिस्टिम घरगुती वापरासाठी खूपच उपयुक्त आहे, विशेषतः जिथे दररोज 18-22 युनिट वीज लागते.

एका दिवसात 5kw Solar Panel 20 ते 22 युनिट पर्यंत वीज निर्माण करू शकतो, हे आपल्या भागातील उन्हाच्या प्रमाणावर अवलंबून असतं.