आजच्या काळात वाढत चाललेले वीज दर, लोडशेडिंग आणि पर्यावरणावर होणारा परिणाम पाहता सौरऊर्जेचा (Solar Energy) वापर करणं हे काळाची गरज बनले आहे.
केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून नागरिकांना सोलर सिस्टीम लावण्यासाठी सब्सिडी दिली जाते.
2 किलोवॅट (kW) सोलर सिस्टीम ही मध्यम घरांसाठी योग्य पर्याय आहे. यात दररोज सुमारे 8 ते 10 युनिट विजेचे उत्पादन होते.
ही सिस्टीम तुम्ही फ्रिज, टीव्ही, पंखे, लाईट्स आणि काही वेळेस वॉशिंग मशीन यांसारख्या घरगुती उपकरणांसाठी वापरू शकता.
2KW सोलर सिस्टीमची बाजारभाव किंमत अंदाजे ₹1,20,000 ते ₹1,40,000 दरम्यान असते.
सरकारतर्फे PM Surya Ghar Yojana अंतर्गत सोलर सिस्टीमवर सब्सिडी दिली जाते. 2KW सिस्टीमवर ₹60,000 सब्सिडी